कोरोना आणि माणुसकी [माणुसकी निभवायला कोरोना कधीच आडवा येत नाही...]
कोरोना आणि माणुसकी... [माणुसकी निभवायला कोरोना कधीच आडवा येत नाही....] लोक मला विचारतात तुला लेख सुचतात तरी कसे , मला यावर हसू येत , लेख सुचत नसतो , लेख हे वास्तव असत जे माझ्या सभोवताली घडलंय मी अनुभवलय आणि ते मी माझ्या शब्दात मांडलय. माझ्या मनात कुणाबद्दल काही नसले तरी, पण माझी लेखणी कधी कडवट तर कधी कुणासाठी गोड असू शकते, कोणाला आवडेल तर कोणाला नाही , ते ज्याचे त्याचे विचार . कोरोनाची वारी जेव्हा माझ्या घरी आली , या कोरोनाच्या वारीने मी आणि माझे वडील सोडता पूर्ण कुटुंब घेरलं , आई , आजी आणि आजोबा कोविडं सेंटरमध्ये दाखल झाले , कुटुंबावरती हे खुप मोठ संकट होत , एवढ्या मोठ्या संकटामध्ये माझा बाप डोंगरसारखं ताठ उभा होता , बापाच्या चेहऱ्याकडे पाहिलं की मला माझ्या अंगात दहा हत्तीच बळ आल्यासारखं वाटायचं , आणि त्या काळात माझं एकच काम होत बापाच्या दोन चपात्या मध्ये लपून अजून एक चपाती कशी खायला घालू , बास पण ते सुद्धा राहील आणि मी ही पॉझीटिव्ह आलो . हाच तो काळ होता जिथं मला माणसातली माणुसकी जागी झालेली दिसली ,तर कुठं मांणसामधील माणूस नाहीसा झालेला दिसला, ' शेजार धर्म ' हा माझ्यासाठी खूप...