Dr.Narayan Gavali ( Librarian )



 माझ्या आयुष्यातील वाटाड्या आज निवृत्त होत आहेत. माझ्या आयुष्यातील वाटाड्या ह्या एका नावातच सगळं काही आलं. वाटाड्या म्हणजे वाट दाखवणारा मग ती येण्या-जाण्याची असो किंवा आयुष्यातील मार्गदर्शनाची .आई-वडील ,भाऊ या व्यतिरिक्त आपल्या आयुष्यात अशी काही माणसं असतात जी नकळत आपल्या हृदयात घर करून जातात .आज मी ज्यांच्याविषयी बोलणार आहे ते म्हणजे माझ्या आयुष्यातील असेच एक व्यक्तिमत्व, त्यांच्या कार्याबद्दल साधेपणाबद्दल बोलायला गेलं तर नक्कीच शब्द कमी पडतील ,असे शब्दात न मांडता येणारे व माझ्यासाठी कायम प्रत्येक प्रसंगात वडिलांसारखा विश्वास व मार्गदर्शनाची साथ देणारे, माझ्या आयुष्यातील आदरणीय व्यक्तिमत्व डॉ. गवळी सर , ग्रंथपाल .पेशाने ग्रंथपाल ,माझ्या बुद्धीकुवतीप्रमाणे अर्थ लावायला गेलं तर, "ज्ञानाच्या देवालयाची गंगा प्रत्येकापर्यंत पोहोचवणारा व्यक्ती म्हणजे ग्रंथपाल".

मी सौरभ ,ही माझी गोष्ट .दहावी मध्ये मला चांगले गुण मिळाले त्यामुळे चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं म्हणून नामांकित असलेले श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय येथे प्रवेश घेतला . प्रवेश घेतलेल्या दिवसापासून ,एवढेच नव्हे तर 11 वी ची मेरिट लिस्ट कधी लागेल यासाठी दिवसातून दोन ते तीन वेळा कॉल करणे ,नवीन शहरात खोलीपासून ते खाण्याच्या सोईपर्यंत , हे कोण कोणासाठी करतं हा प्रश्न कायम माझ्या मनात यायचा .माझ्याकडे एक चांगला विद्यार्थी म्हणून पाहण्याचा सगळ्यांचा दृष्टीकोन तसेच सरांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास. अकरावी मध्ये 55 % पडले. दहावी मध्ये 82%असलेला मुलगा 55% वरती आला. त्या काळात काय माहित पण जे सर मला नीट ओळखत नव्हते ते माझ्या घरी वडिलांना व कुटुंबाला सांगताना म्हणाले , काही नाही नवीन जागा, नवीन लोक ,फरक पडतोच ना ,झालं. बारावी मध्ये वजन कमी करण्याच्या मागे वर्ष संपून गेलं .बारावी कधी गेली ते कळालच नाही . बारावीला 49.08% टक्के ,अशा काळात अहो घरचेच सोडा पण विद्यार्थ्यालाही स्वतःकडे पाहता येत नाही. त्याकाळामध्येही माझ्यावरती विश्वास ठेवून धडपड करून महाविद्यालयामध्ये मला B.Sc.साठी प्रवेश मिळवून देणारे म्हणजे सर .त्यावेळी तर नक्कीच थोडी जाणीव झाली ,आता नाही एवढ्या उच्च पदावरील व्यक्ती आपले ना पाहुणे ना कोण एवढा अफाट विश्वास ठेवून आपल्यासाठी एवढं का ? हा प्रश्न तर कायम मनात होताच .पण आता नाही हे ठरवलं ,आता काही कारणं नाही द्यायची .त्यावेळी FY.B.Sc. चा रिझल्ट लागला. तेव्हा मी अपेक्षापेक्षा खूप चांगल्या गुणांनी पास झालो होतो .त्यावेळी मी व्यसनमुक्ती शिबिरात होतो .सरांचे पण त्या शिबिरास खूप मोठे योगदान असल्याकारणाने व वयाचा आणि पदाचा कसलाही मोठेपणा न बाळगता ते त्या शिबिरामध्ये तरूण कार्यकर्ता म्हणून सर कार्यरत असायचे .त्यावेळी असं वाटलं ,पळत सरांकडे जावं आणि माझे मार्क्स सांगावेत .एफ वाय बीएस्सी ते पदवी पर्यंत जे चांगले मार्क्स मिळाले ते सांगण्याचा उत्साह, धडपड फक्त एवढ्यासाठी असायची की सर जे दोन शब्द बोलतात त्यातून मला मिळालेली ऊर्जा.

विद्यार्थ्यांमध्ये कधी बाहेर दिसलो ,कुठे बाहेर फिरताना दिसलो किंवा विद्यालयाच्या आवारामध्ये कुठे दिसलो तर बोलावून घेऊन चौकशी करणे, आता काय करतोय ?अभ्यास झाला का ?काही लागलं तर सांग. पुस्तक घेऊन जा .आपल्यासाठी घरचे कष्ट करतात, त्यासाठी आपण काही तरी केले पाहिजे. या सगळ्यांची जाणीव मला करून देणं. तसेच माझी चौकशी करणं .यातून जो आपलेपणा , मला वाटणारा आधार तो एक खूप मोठा होता सर. हे फक्त माझ्यासाठीच नव्हे तर प्रत्येक विद्यार्थ्यांवर सरांचा असलेला अफाट विश्वास हे माझ्यासाठी नक्कीच एक गूढ आहे.पदवीनंतर रसायन शास्त्र या विषयांमध्ये मी केलेल्या प्रोजेक्ट ची महाराष्ट्र मध्ये निवड झाली, त्यावेळेस सरांचा मला अभिनंदनाचा मेसेज आला. अभिनंदनाच्या मेसेज बरोबरच सरांच मला अजून एक वाक्य आठवतं , ते वाक्य आणि सर अजून सुद्धा त्या वाक्य प्रमाणेच कायम माझ्याबरोबर आहेत. ते वाक्य असं की, "सौरभ आपल्याला येथेच नाही थांबायचं , खुप पुढे जायचंय" .हे वाक्य माझ्यासाठी एवढ मोठ वाक्य होतं ,एवढी मोलाची साथ होती असं वाटतं की सर माझ्या पावलाबरोबरच पाऊल टाकत आहेत. एवढ्या मोठ्या पदावर ,एवढ्या कामाचा भार असून विद्यार्थ्यांवर असलेलं सरांच बारीक लक्ष ,विद्यार्थ्यांवर असलेला अफाट विश्वास हे कस काय सर्व जमत सर तुम्हाला? तुम्ही लावलेली शिस्त नक्कीच अशीच पुढे चालत राहील .कॉलेज सोडताना जेवढ मन भरून नव्हत आलं आज तेवढ तुम्हाला निरोप देताना येत आहे.

या विषाणूचा काळामध्ये मी आपल्यापर्यंत येऊ शकत नसेल पण मी माझ्या लेखाद्वारे आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचू शकेल हीच एक इच्छा.



आपलाच विदयार्थी,

सौरभ भाऊसाहेब आवचर.

Comments

  1. सुंदर..खुपच छान लिखाण..👌
    सरांसारखे मार्गदर्शक मिळणं हि खूपच भाग्याची गोष्ट आहे, अगदी परीस मिळाल्या सारखीच.

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप धन्यवाद आपण दिलेला प्रतिसाद नक्कीच प्रेरणादाई आहे .😊😊😊

      Delete
  2. अतिशय ओघवत्या शब्दात मांडणी.. ✌️

    ReplyDelete
    Replies
    1. मनापासून धन्यवाद गुरुवर्य , आपले प्रेम आमच्यावरती अशेंच राहुद्या 😊😊

      Delete
  3. खुपच छान सौरभ👌👌👌👌

    ReplyDelete
    Replies
    1. मनापासून धन्यवाद विशाल सर आपले प्रेम अशेंच राहुद्या ,आपला प्रतिसाद आमच्यासाठी मोलाचा आहे😊😊

      Delete
  4. आपले मनापासून धन्यवाद 😊😊

    ReplyDelete
  5. #अप्रतिम शब्दरचना सुंदर लेख👌😊💯

    ReplyDelete
    Replies
    1. मनापासून धन्यवाद 😊😊

      Delete
  6. आयुष्याच्या प्रवासात आपल्या गाडीला असा एक चालक लागतोच तो फक्त वाट दाखवेल.... वळण आल्यावर सांगेल....तेव्हाच आयुष्य वाकड्या वाटेवर सरळ मार्गाने धावते.... अभिमान आहे सौरभ सर ...कवी कांतासुत यांच्या आयुष्यातील एक परीस व्यक्तिमत्व आहात तुम्ही.

    ReplyDelete

Post a Comment