कोरोना आणि माणुसकी [माणुसकी निभवायला कोरोना कधीच आडवा येत नाही...]



कोरोना आणि माणुसकी...


[माणुसकी निभवायला कोरोना कधीच आडवा येत नाही....]

लोक मला विचारतात तुला लेख सुचतात तरी कसे , मला यावर हसू येत , लेख सुचत नसतो , लेख हे वास्तव असत जे माझ्या सभोवताली घडलंय मी अनुभवलय आणि ते मी माझ्या शब्दात मांडलय. 

माझ्या मनात कुणाबद्दल काही नसले तरी, पण माझी लेखणी कधी कडवट तर कधी कुणासाठी गोड असू शकते, कोणाला आवडेल तर कोणाला नाही , ते ज्याचे त्याचे विचार .

कोरोनाची वारी जेव्हा माझ्या घरी आली , या कोरोनाच्या वारीने मी आणि माझे वडील सोडता पूर्ण कुटुंब घेरलं , आई , आजी आणि आजोबा कोविडं सेंटरमध्ये दाखल झाले , कुटुंबावरती हे खुप मोठ संकट होत , एवढ्या मोठ्या संकटामध्ये माझा बाप डोंगरसारखं ताठ उभा होता , बापाच्या चेहऱ्याकडे पाहिलं की मला माझ्या अंगात दहा हत्तीच बळ आल्यासारखं वाटायचं , आणि त्या काळात माझं एकच काम होत बापाच्या दोन चपात्या मध्ये लपून अजून एक चपाती कशी खायला घालू , बास पण ते सुद्धा राहील आणि मी ही पॉझीटिव्ह आलो .

हाच तो काळ होता जिथं मला माणसातली माणुसकी जागी झालेली दिसली ,तर कुठं मांणसामधील माणूस नाहीसा झालेला दिसला,

' शेजार धर्म ' हा माझ्यासाठी खूप अर्थदायी शब्द ठरला , या शब्दाचा अर्थ मला चांगल्यारीतीने उमगला तो या काळात , सगळं सुखकारक असल्यावर तर कोणी पण येत जातच वो घरी , देवाण घेवाण पण चालूच असते ,पण खरा कसोटीचा काळ असतो तो , एखाद्या कुटुंबाला त्याच्या पडत्या काळात संयम देणं आधाराचे दोन शब्द बोलणं , माणसात देव असतो हे ऐकयचो ते पाहायला मिळाले ते याच काळात , कुणी शेजारी म्हणून आले तर कोणी मित्र म्हणून विचारपूस केली , अश्या काळात दोन आधारचे शब्द आणि होणारी मदत ही त्या कुटुंबासाठी लाखमोलाची असते , जे आले ते मांणसातले देवच होते अस म्हणं काही वावग ठरणार नाही . 

या जगात माणूसकी पाहायची म्हटलं तरी गुंतवणूक करावी लागते , आत्ता तुम्हाला प्रश्न पडेल तू कसली गुंतवणूक केलीस , मी नक्कीच नाही वो , माझ्या बापाची पुण्याई , हो पाहिलंय मी माझ्या बापमध्ये देव ,पाहिलेत मी तुकाराम महाराज , हो प्रत्येक कुटुंबाला आर्थिक गरज असते पण तुम्हीच मला सांगाना कोणता माणूस स्वतःचा जीव धोक्यात घालून घरोघरी जाऊन दुध पोचवलं तर कुणाच्या सामानच्या पिशव्या पोच करेल, अश्या पिशवीला लोक हात लावायला घाबरतात ते पण अश्या काळात ज्या काळात त्या कुटुंबातील सदस्य कोरोना सारख्या आजराने दगावले असेल , अहो काहीजण आपण मास्क लावल असताना सुद्धा या काळात आपल्यापासून 200 मीटरवर थांबून बोलायला भितेत , सांगणारे बरेच होते कश्याला जाता स्वतःची काळजी घ्या, दुध घालणं गरजेचं आहे का , त्यांचं ते करतील ना , अहो बाहेरचे सोडा पण घरचे सुद्धा सांगून थकले ,त्यांचं एकच म्हणण असायचं घरात त्यांच्या छोटी मूल आहेत दुधावाचून रडतील आपणच आज अस वागलो तर आपल्याबरोबर उद्या लोक काय वेगळं वागतील ? काही लोक कशे वागा ते त्यांचा राक्षस रूप सोडत नाहीत तो विषय वेगळा म्हणा , असो आपल्याला कोणावर टिका-टिपणी नाही करायची , पण जसं आपण म्हणतो ना जे करायचं ते इथेच फेडायचय त्याची चांगली प्रचिती मला या काळात आली. यात माझं काही नाही जे आज आम्ही सगळे सुखरुप आहोत त्याच एकमेव कारण माझा बाप .

मला यावेळी अभंगाच्या दोन ओळीं आठवतात त्या अश्या की 

माझ्या वडिलांची मिरासी गा देवा। तुझी चरणसेवा पांडुरंगा।।

इथे मिरासचा अर्थ वतनदारी असा आहे , देवा तुला जर मला वतन दारी दयायची असेल तर ही वतनदारी दे माझ्या वडिलांनाची पैश्यानी न्हवे तर विचाराने मला आभाळाएवढ बनव . 

या सगळया लेखातून एकच गोष्ट स्पष्ट करू वाटते , ती म्हणजे अश्या काळात कुणाचा तरी तुम्ही आधार बनले तर उद्या तुमचा आधार लोक बनतील , आणि आधार बनता येत नसल तर कोणाची निराशा बनू नका , वेळ आहे , देव न करो पण ही वेळ कोणत्या ना कोणत्या स्वरूपात सगळ्यांवर येते, आपणास कडवट  वाटेल पण खर आहे ...



                                                           लेखन.

                                                      आवचर.एस. बी

Comments

  1. Replies
    1. एक उत्कृष्ट लेखक व कवी आपल्याकडून मिळालेला प्रतिसाद माझ्यासाठी खुप मोलाचा आहे... 😊😊

      Delete
  2. अप्रतिम लेखन✍️💯

    ReplyDelete
  3. अफाट आहे लेखन ....अगदी वास्तव सगळं विस्तवासारखे मांडले

    ReplyDelete

Post a Comment