Posts

Image
Dr.Narayan Gavali ( Librarian )  माझ्या आयुष्यातील वाटाड्या आज निवृत्त होत आहेत. माझ्या आयुष्यातील वाटाड्या ह्या एका नावातच सगळं काही आलं. वाटाड्या म्हणजे वाट दाखवणारा मग ती येण्या-जाण्याची असो किंवा आयुष्यातील मार्गदर्शनाची .आई-वडील ,भाऊ या व्यतिरिक्त आपल्या आयुष्यात अशी काही माणसं असतात जी नकळत आपल्या हृदयात घर करून जातात .आज मी ज्यांच्याविषयी बोलणार आहे ते म्हणजे माझ्या आयुष्यातील असेच एक व्यक्तिमत्व, त्यांच्या कार्याबद्दल साधेपणाबद्दल बोलायला गेलं तर नक्कीच शब्द कमी पडतील ,असे शब्दात न मांडता येणारे व माझ्यासाठी कायम प्रत्येक प्रसंगात वडिलांसारखा विश्वास व मार्गदर्शनाची साथ देणारे, माझ्या आयुष्यातील आदरणीय व्यक्तिमत्व डॉ. गवळी सर , ग्रंथपाल .पेशाने ग्रंथपाल ,माझ्या बुद्धीकुवतीप्रमाणे अर्थ लावायला गेलं तर, " ज्ञानाच्या देवालयाची गंगा प्रत्येकापर्यंत पोहोचवणारा व्यक्ती म्हणजे ग्रंथपाल". मी सौरभ ,ही माझी गोष्ट .दहावी मध्ये मला चांगले गुण मिळाले त्यामुळे चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं म्हणून नामांकित असलेले श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय येथे प्रवेश घेतला . प्रवेश घेतलेल...